Facebook Twitter
tenant
जळगाव पोलीस चॅटबॉट

प्रेस रिलीज



# तारीख शीर्षक डाउनलोड पहा
1 25-12-2025 प्रति, मा. संपादक, दैनिक ---------- प्रेस नोट दिनांक :- २४१२२०२५ विषय :- जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष वाहन चेकिंग मोहिमे अंतर्गत ११०० हून अधिक वाहनांवर धडक कारवाई; १३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल. जळगाव जिल्ह्यात वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचपा बसवण्यासाठी आणि गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी दि. २४१२२०२५ रोजी संपूर्ण जिल्ह्यात विशेष वाहन चेकिंग मोहीम (Special Vehicle Checking Drive) राबविण्यात आली. मा. श्री. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव; यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व वाहतूक शाखांना कडक नाकाबंदी करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व वाहतूक शाखांनी आपली पथके तयार करून वाहनांची कसून तपासणी केली. या विशेष मोहिमेत प्रामुख्याने विना नंबर प्लेट वाहने (Without Number Plate) आणि अल्पवयीन वाहन चालक (Underage Drivers) यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. दि. २४१२२०२५ रोजी राबविण्यात आलेल्या मोहिमेतील कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे: या मोहिमेत एकूण ११०६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण १३,७१,४५०- (तेरा लाख एकाहत्तर हजार चारशे पन्नास रुपये) तडजोड शुल्क (दंड) वसूल करण्यात आला आहे. कारवाईचे वर्गीकरण: १. विना नंबर प्लेट केसेस (Without Number Plate): नंबर प्लेट नसलेल्या किंवा फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या एकूण ४६३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४,४५,०००- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. २. अल्पवयीन वाहन चालक केसेस (Underage Driving): वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या एकूण १०७ अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली असून, यातून ४,०४,५००- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांकडे वाहन देऊ नये, याबाबत पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे. ३. इतर केसेस (Other MV Act Cases): इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५३६ वाहनांवर कारवाई करून ५,२१,९५०- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ठळक कामगिरी: सदर मोहिमेत जळगाव शहर वाहतूक शाखा, भुसावळ शहर, चाळीसगाव शहर वाहतूक शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. जनसंपर्क अधिकारी डाउनलोड
2 24-12-2025 जळगाव घटकात मानवी आरोग्याला नशा येणाऱ्या गांजा सह गुंगीकारक औषधीचा सुमारे 19 गुन्ह्यांमधील जप्त असलेला एकूण 709.280 किलोग्रॅम गांजा नष्ट केले बाबत.... डाउनलोड
3 16-12-2025 मा. डॉ.श्री.महेश्वर रेड्डी सो.पोलीस अधिक्षक जळगाव यांच्या संकल्पनेतून पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे Sunstroat Green Technology Pvt Ltd या कंपनीचे 100 किलोवॉट क्षमतेचे सोलर प्लांट मा.श्री. रोहन घुगे सो.जिल्हाधिकारी जळगाव यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला डाउनलोड
4 15-12-2025 स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी सुप्रीम कॉलनी येथेल घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून 02 आरोपी अटक केले बाबत.. डाउनलोड
5 15-12-2025 मोटर सायकलच्या डिक्की मधून रोख रकमेची चोरीचा गुन्हा एमआयडीसी पोस्ट कडून उघड ,चोरी करणारे त्रिकुट मुद्देमालासह जेरबंद... डाउनलोड
6 10-12-2025 बस मध्ये चढणा-या प्रवासाच्या पँटच्या खिशातील पैसे काढून घेणा-या पाकिटमार यांना एमआयडीसी पोलीसांनी केली अटक. डाउनलोड
7 13-12-2025 पोलीस अधीक्षक डॉ. श्री. महेश्वर रेडडी यांचे संकल्पनेतुन रक्तकेंद्र शासकीय वैदयकीय महाविदयाल जळगाव यांचे तर्फे रक्तदान शिबीर आयोजित केले बाबत डाउनलोड
8 13-12-2025 स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे कामगिरी घरफोडी करणारे आंतरराज्य अट्टल गुन्हेगारास अटक... डाउनलोड
9 12-12-2025 मेहुणबारा पोलीस स्टेशन कढून महिलेचा विनयभंग करणारा 09 वर्ष्यापासून फरार असलेल्या आरोपीला अटक.... डाउनलोड
10 07-12-2025 रावेर शहरातील रथ यात्रेतून सोन साखळी चोरणाऱ्या महिलेस अटक.. डाउनलोड

 तुमची सुरक्षा आमची वचनबद्धता 

illustration